चांगला पाऊसपाणी झाल्यामुळे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल
यंदाच्या चांगल्या पावसाने साडय़ा आणि दागिन्यांच्या बाजारात मोठय़ा आशा निर्माण केल्या आहेत. विशेषत: साडय़ांच्या बाजारात सध्या प्रचंड उत्साह असून यंदा खप दुप्पट होण्याची अपेक्षा अनुभवी व्यापारी वर्तवत आहेत. सोन्या-चांदीचे दागिने व वस्तूंचा बाजार अजूनही काहीसा थंड असला तरी पाऊसपाणी चांगले राहिल्यामुळे ग्राहकांचा ‘मूड’ पालटून अंतिमत: त्याचा परिणाम खरेदीत दिसून येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दसरा-दिवाळीच्या खरेदीला पुणेकरांनी आतापासूनच सुरुवात केली असून साडय़ा आणि सोन्याच्या दागिन्यांचे घर असलेला लक्ष्मी रस्ता गजबजू लागला आहे. सणासुदीला महिला वर्गाकडून मोठय़ा प्रमाणावर केल्या जाणाऱ्या साडीखरेदीलाही सुरुवात झाली आहे. लहान-मोठे साडी व्यापारी जवळपास दोन महिन्यांपासून दिवाळीसाठी तयारी करत असून आता ग्राहकांसाठी सज्ज झाले आहेत. ‘स्वामिनी’ साडय़ांच्या दुकानाचे प्रमुख रियाझ शेख म्हणाले, गतवर्षी राज्याला दुष्काळाने भाजून काढले होते, तसेच लग्नाचे मुहूर्त देखील कमी होते. यंदा मात्र मान्सून चांगला झाल्यामुळे चांगले पीक होण्याची अपेक्षा असून पुढील जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. या गोष्टींमुळे मध्यम वर्ग आणि निम्न आर्थिक स्तरातील वर्गही खरेदीसाठी तयार होतो आहे. दुसरीकडे दंड भरून काळा पैसा घोषित करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेमुळेही मोठय़ा प्रमाणावर पैसा बाहेर निघत असून त्याचा बाजाराला फायदा होत आहे. या सर्व गोष्टींमुळे साडीबाजाराला यंदा दुप्पट खपाची अपेक्षा आहे. खास दिवाळीसाठी गंधर्व पैठणी, मुद्रांक पैठणी, विशिष्ट अशा ‘रेगीचा’ डिझाईनमधील संगीता सिल्क या साडय़ा बाजारात आणल्याचेही त्यांनी सांगितले.
सोनेखरेदी दसऱ्यापासून वाढेल
सोन्याच्या बाजारात मात्र गेल्या वर्षी अधिक गर्दी होती, असे व्यापारी सांगत आहेत. त्या तुलनेत यंदा अद्याप प्रतिसाद कमी आहे. तरीही ग्राहकाचा कल पालटून तो बाहेर पडेल व दसऱ्यापासून खरेदी वाढेल, अशी आशा वर्तवली जात आहे. दसऱ्याला सोन्याची आपटय़ाची पाने, सोन्याची नाणी व वेढण्यांना मोठी मागणी असते. बहुतेक ग्राहक आपापल्या क्रयशक्तीप्रमाणे थोडे तरी सोने दसऱ्याला घेतातच. त्यानंतर दिवाळीपूर्वी दागिन्यांना असलेली मागणी वाढते. दिवाळीला चांदीच्या वस्तू भेट देण्याचा ‘ट्रेंड’ ओळखून अनेक पेढय़ांनी चांदीच्या लहान वस्तूमध्ये वैविध्य आणले आहे. ‘रांका ज्वेलर्स’च्या लक्ष्मी रस्ता विभागाचे व्यवस्थापक प्रसाद बांदोडकर म्हणाले, आम्ही यंदा चांदीच्या भेटवस्तूंमध्ये ‘सिल्व्हर मिठाई’ अशी संकल्पना आणली आहे. यात मिठाईच्या पुडय़ात शुद्ध चांदीची करंजी, बर्फी असे सहा पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले असून त्याला प्रतिसाद अपेक्षित आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये या वर्षी काळसर रंगाकडे झुकलेल्या सोन्याच्या ‘अँटिक ज्वेलरी’चा ‘ट्रेंड’ दिसून येत आहे. त्या तुलनेत लालसर रंगाची ‘टेंपल ज्वेलरी’ कमी दिसत आहे.
दसरा-दिवाळीसाठी यंदा बाजारात काय काय?
* साडय़ा : आठशे रुपयांपासून अगदी एक ते सव्वा लाखांपर्यंतच्या पैठणी साडय़ा, बांगडी-मोर पैठणी, ब्रोकेड सिल्कच्या जरदोसी व स्टोन वर्क केलेल्या उंची डिझायनर साडय़ा, कांची ब्रोकेड, नल्ली सिल्क, अरणी सिल्क, लल्लेश्वरी सिल्क, मंगम्मा सिल्क, कल्याणी सिल्क, ज्यांट सिल्क, कांथा वर्क, भागलपुरी, माहेश्वरी, चंदेरी, कोरियन सिल्क.
* दागिने : काळसर सोन्याची अँटिक ज्वेलरी, उंची जडाऊ दागिने, तरुणांची पसंती मिळवणारे व्हाईट गोल्ड व प्लॅटिनमचे दागिने, खास महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये ठुशी, नथीचे विविध प्रकार, लक्ष्मी हार, बोरमाळ, गोठ, पाटल्या, विविध डिझाईनच्या बांगडय़ा.