केंद्र शासनाच्या सेवाकराच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या हॉटेल व रेस्टॉरन्टच्या एक दिवशीय देशव्यापी बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे रेस्टॉरन्ट अॅण्ड हॉटेल असोसिएशनच्या नेवृत्वाखाली शहरातील हॉटेल व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाले. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल सोमवारी बंद होती.
वातानुकूलित हॉटेलसाठी सेवा कर लावण्याच्या निर्णयाला हॉटेल चालकांची विरोध केला आहे. कर आकारणी चुकीच्या पद्धतीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, हॉटेलच्या ठरावीक भागात किंवा केवळ मालकाच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा असल्यास संपूर्ण हॉटेलला त्याबाबतचा सेवा कर लावण्याचा हा निर्णय आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यानुसार बंद पाळण्यात आला. बंदला शहरात ९५ टक्के प्रतिसाद मिळाला.
हॉटेल बंदला शहरात चांगला प्रतिसाद
केंद्र शासनाच्या सेवाकराच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या हॉटेल व रेस्टॉरन्टच्या एक दिवशीय देशव्यापी बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.
First published on: 30-04-2013 at 02:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good response for hotel band in pune