पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी पुण्यातील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘मिशन १०० अॅट १००’ या अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पीएमपीच्या सेवेत सुधारणांची किती आवश्यकता आहे हेच गेल्या तीन दिवसांत स्पष्ट झाले आहे. सेवा सुधारण्यासाठी शंभर प्रवासी मित्र सध्या उत्स्फूर्तपणे काम करत आहेत आणि अभियानाच्या पहिल्या चार दिवसांत चारशेहून अधिक तक्रारी व निरीक्षणे या स्वयंसेवकांनी नोंदवली आहेत.
पुणे व पिंपरीतील साठ लाख नागरिकांसाठी पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध असून पीएमपीची ही बहुचर्चित सेवा सुधारण्यासाठी पीएमपी प्रवासी मंचने पुढाकार घेतला आहे. पीएमपी सेवेचा लाभ दैनंदिन आठ ते दहा लाख प्रवासी घेत असले, तरी त्यांना अनेक अडचणींना रोज तोंड द्यावे लागते. पीएमपी प्रवाशांच्या या अडचणी प्रशासनाने सोडवल्यास प्रवासी संख्या निश्चितपणे वाढू शकते. मात्र, प्रवाशांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच प्रशासनही थेट प्रवाशांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे प्रवासी व प्रशासन यांच्यात संवाद होत नाही. ही उणीव लक्षात घेऊन पीएमपी सेवा सुधारण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. पुढील शंभर दिवस हे अभियान चालेल.
या अभियानात काम करण्यासाठी आतापर्यंत शंभर प्रवासी मित्र मिळाले असून त्यांच्यासाठी काही अटी देखील निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या प्रत्येकाने रोज वा आठवडय़ातून किमान एकदा तरी पीएमपीनेच प्रवास करणे बंधनकारक आहे. तसेच पीएमपीने प्रवास करताना त्यांनी प्रवासातील निरीक्षणे नोंदवायची असून प्रवाशांना तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन तसेच अन्य कोणती यंत्रणा उपलब्ध आहे याचीही माहिती द्यायची आहे. पीएमपी प्रवासाचे सर्व नियम या प्रवासी मित्रांनी पाळावेत अशीही अट आहे. पीएमपी हेल्पलाइनचा उपयोग करा, असे आवाहन करणारी हजारो पत्रकेही प्रवाशांना वाटली जात असून शंभर प्रवासी मित्रांकरवी शंभर दिवसांत पीएमपी प्रवासातील दहा हजार निरीक्षणे/तक्रारी नोंदवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पीएमपी सेवेसंबंधीच्या चांगल्या बाबी देखील प्रवाशांनी आवर्जून कळवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पीएमपी सेवा सुधारण्यासाठी प्रवासी मित्र सरसावले
पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी शंभर प्रवासी मित्र सध्या उत्स्फूर्तपणे काम करत आहेत आणि अभियानाच्या पहिल्या चार दिवसांत चारशेहून अधिक तक्रारी व निरीक्षणे या स्वयंसेवकांनी नोंदवली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-11-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good response to mission at