पुणे : विकास आराखडा आणि अर्थसंकल्प यांचा एकमेकांशी संबंध आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच जे शहरीकरण वाढत आहे, त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्याला पाप समजत राहिलो. राज्यातील ५० टक्के लोकसंख्या पाचशे शहरांत आणि उर्वरित लोकसंख्या चाळीस हजार गावांत राहत आहे. या पाचशे शहरांचा चेहरामोहरा बदलला, तर पन्नास टक्के लोकसंख्येला उत्तम जीवनमान देऊ शकतो असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिका, यशदा, पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि बर्वे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘पुणे अर्बन डायलॉग : आव्हाने आणि उपाय’ या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘नगर नियोजनाच्या कायद्याचे बंधन असल्यामुळे विकास आराखडा केला जात आहे. गेली अनेक वर्षे महापालिका आणि राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात विकास आराखडा आणि अर्थसंकल्प यांचा संबंध दिसत नव्हता. त्यामुळे नियोजन करणारे नियोजन करत होते, तर विकास करणारे विकास करीत होते. मात्र, विकास आराखडा आणि अर्थसंकल्प यांचा एकमेकांशी संबंध आवश्यक आहे. माजी सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांनी परिषदेची भूमिका विषद केली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आभार मानले.
मुंबईत एकाच तिकिटावर सार्वजनिक सेवा
‘मुंबईमध्ये एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणि वॉटर टॅक्सी आणण्यात येत आहेत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची दोनशे मीटरवरून प्रवासाची साधने आणि गंतव्य स्थानापर्यंतचे प्रवासाचे पर्याय मिळणार आहे. याची अंमलबजावणी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात होणार आहे.