किराणा माल विक्रेत्याला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली.
कुंदन शिंदे, अक्षय भालके (दोघे रा. अप्पर इंदिरानगर ओटा वसाहत, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महादेव मांगीलाल जाट (वय ३३, रा. अप्पर इंदिरानगर ओटा वसाहत, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाट यांचे ओटा वसाहत परिसरात बालाजी सुपर मार्केट किराणा माल विक्रीचे दुकान आहे. शिंदे आणि भालके सराइत गुंड आहेत. दोघेजण जाट यांच्या दुकानात गेले. या परिसरात व्यवसाय करायचा असले तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दोघांनी त्यांना दिली. दोघांनी जाट यांना कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील १८०० रुपये घेतले.
त्यानंतर आरोपी शिंदे आणि भालके पुन्हा जाट यांच्या दुकानात आले. त्यांनी जाट यांच्याकडे दोन हजार रुपये मागितले. जाट यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी दहशत माजविली. आम्ही या परिसरातील भाई असून पैसे न दिल्यास जीवे मारु, अशी धमकी देऊन जाट यांच्यावर कोयता उगारला. घाबरलेल्या जाट यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक आदलिंग तपास करत आहेत.