सोसायटीतील कामाचा ठेका न दिल्याने धमकी

पुणे : धायरीतील डीएसके विश्व सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा ठेका न दिल्याने एका सराइताने सोसायटीत दहशत निर्माण केली. सोसायटीतील रहिवाशांना धमकावले. एकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून तिघांना अटक केली.

Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Chargesheet by CBI filed against three including prevention officer in bribery case
लाचखोरीप्रकरणात प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल, सीबीआयची कारवाई
Bihar assembly elections will be held under the leadership of Nitish Kumar Modi Information from Deputy Chief Minister Samrat Chaudhary
बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार-मोदींच्या नेतृत्वातच; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?

या प्रकरणी सनी सुरेश चव्हाण (वय ३४, रा. ओमेगा सोसायटी, धायरी), पुरुषोत्तम अनिरुद्ध कोल्हे (वय ३१) आणि सुदर्शन केशव भेगडे (वय ३८, दोघे रा. धायरी) यांना अटक करण्यात आली आहे. चव्हाण आणि साथीदारांनी केलेल्या मारहाणीत दिलीप गोपाल कृष्णन (रा. डीएसके विश्व, धायरी) जखमी झाले आहेत. कृष्णन यांनी याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सनी चव्हाण सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. धायरीतील डीएसके विश्व सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) कामाचा ठेका मिळावा म्हणून सनी सोसायटीतील पदाधिकारी तसेच रहिवाशांवर दबाब आणत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अनिल पोकळे यांनी कृष्णन यांना सोसायटीच्या तळमजल्यावर बोलावून घेतले. ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा ठेका का देत नाही? ’ अशी विचारणा करून सनी आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार कोल्हे, भेगडे यांनी धमकावण्यास सुरुवात केली.

त्यानंतर कृष्णन यांना लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने मारहाण केली. सोसायटीच्या आवारात शिवीगाळ केल्याने रहिवासी भयभीत झाले. दहशत निर्माण करून सनी, त्याच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले. सोसायटीतील रहिवाशांनी सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पसार झालेल्या तिघांना अटक करण्यात आली.

गुंडांचा वावर

गेल्या काही दिवसांपासून धायरीतील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा डीएसके विश्व सोसायटीच्या परिसरात वावर वाढला आहे. रात्री-अपरात्री येऊन शिवराळ भाषेत बोलणे, विनाकारण सोसायटीच्या आवारात येणे असे प्रकार सातत्याने होत आहेत, अशा तक्रारी सोसायटीतील रहिवाशांनी केल्या. दरम्यान, सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सोसायटीतील रहिवाशांना धीर दिला. गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Story img Loader