सोसायटीतील कामाचा ठेका न दिल्याने धमकी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : धायरीतील डीएसके विश्व सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा ठेका न दिल्याने एका सराइताने सोसायटीत दहशत निर्माण केली. सोसायटीतील रहिवाशांना धमकावले. एकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून तिघांना अटक केली.
या प्रकरणी सनी सुरेश चव्हाण (वय ३४, रा. ओमेगा सोसायटी, धायरी), पुरुषोत्तम अनिरुद्ध कोल्हे (वय ३१) आणि सुदर्शन केशव भेगडे (वय ३८, दोघे रा. धायरी) यांना अटक करण्यात आली आहे. चव्हाण आणि साथीदारांनी केलेल्या मारहाणीत दिलीप गोपाल कृष्णन (रा. डीएसके विश्व, धायरी) जखमी झाले आहेत. कृष्णन यांनी याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सनी चव्हाण सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. धायरीतील डीएसके विश्व सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) कामाचा ठेका मिळावा म्हणून सनी सोसायटीतील पदाधिकारी तसेच रहिवाशांवर दबाब आणत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अनिल पोकळे यांनी कृष्णन यांना सोसायटीच्या तळमजल्यावर बोलावून घेतले. ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा ठेका का देत नाही? ’ अशी विचारणा करून सनी आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार कोल्हे, भेगडे यांनी धमकावण्यास सुरुवात केली.
त्यानंतर कृष्णन यांना लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने मारहाण केली. सोसायटीच्या आवारात शिवीगाळ केल्याने रहिवासी भयभीत झाले. दहशत निर्माण करून सनी, त्याच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले. सोसायटीतील रहिवाशांनी सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पसार झालेल्या तिघांना अटक करण्यात आली.
गुंडांचा वावर
गेल्या काही दिवसांपासून धायरीतील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा डीएसके विश्व सोसायटीच्या परिसरात वावर वाढला आहे. रात्री-अपरात्री येऊन शिवराळ भाषेत बोलणे, विनाकारण सोसायटीच्या आवारात येणे असे प्रकार सातत्याने होत आहेत, अशा तक्रारी सोसायटीतील रहिवाशांनी केल्या. दरम्यान, सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सोसायटीतील रहिवाशांना धीर दिला. गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.