गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय असून ते प्रसिद्धीसाठी शरद पवारांवर टीका करत असतात त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अशा शब्दात रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर पडळकरांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार हे बिनडोक आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बोटे घालण्याची सवय आहे. असा टोला त्यांनी रोहित यांना लगावला आहे. MPSC तरुणांच्या आंदोलनाचे शरद पवार यांना श्रेय घ्यायचे म्हणून ते बैठक घडवून आणत आहेत. प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत आहेत. असे देखील त्यांनी अधोरेखित केले. चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पडळकर पिंपरी- चिंचवडमधील राहटणीत आले होते. त्यावेळेस त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा