अपूर्वा अलाटकर हिला पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला असा बहुमान मिळाला आहे. पुण्यातील वनाज येथील मेट्रो मार्गाचं उद्घाटन ४ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी पहिल्यांदाच लोकोपायलट म्हणून अपूर्वा अलाटकर हिला पुणे मेट्रोचं सारथ्य करण्याची मोठी संधी मिळाली.

अपूर्वा मुळची सातारची आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने थेट मेट्रोच्या चालकपदाचीच धुरा सांभाळल्याने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. मेट्रो चालवणं जमेल की नाही याची कुटुंबातील सर्वांना चिंता होती, पण आपण ते याोग्यरीत्या करून दाखवलं, अशी भावना अपूर्वाने व्यक्त केली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून अपूर्वाचा हा अनोखा प्रवास आज जाणून घेऊया…

Story img Loader