आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतो. त्यात रासायनिक अन्नपदार्थ खाल्ल्याने अनेक गंभीर आजारही बळावतात. या रासायनिक अन्नपदार्थांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पुण्यातील प्रकाश टेमघरे आणि हर्षदा टेमघरे या दाम्पत्यानं एक पाऊल उचललं आहे. हे दाम्पत्य सेंद्रीय शेत मालापासून तयार केलेल्या रसायनमुक्त जेवणाची सेवा लोकांना पुरवतात.
पुण्यातील वारझे, बाणेर व अन्य भागांत त्यांच्या ‘अभिनव भोजन’ या डब्याची सेवा सुरू आहे. टेमघरे दाम्पत्यानं ‘अभिनव भोजन’ ही सेवा २०१९ पासून सुरू केली. यामागे देखील एक गोष्ट आहे. ही गोष्ट नेमकी काय आहे? रसायनमुक्त जेवणा मागची नेमकी संकल्पना काय? हे व्हिडीओमधून जाणून घ्या.
‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.