‘घाशीराम कोतवाल’ हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. बऱ्याच वर्षांपूर्वी याच नावाचं नाटक आलं होतं जे प्रचंड चर्चेत होतं. आज आपण याच घाशीराम कोतवालाच्या वाड्याला भेट देणार आहोत. आपण हा वाडा तर पाहणार आहोतच पण घाशीराम कोतवाल कोण होता?
घाशीराम कोतवालचा वाडा नक्की कुठे आणि कसा आहे? पेशव्यांच्या काळात त्याचं नाव का चर्चेत आलं होतं? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या भागातून