पुणे : सिंहगड पायथ्यापासून अपहरण करण्यात आलेले शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर (वय ७२) यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोळेकर यांचा मृतदेह राजगड तालुक्यातील ओसाडे गावात सापडला असून, त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातून दोघांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोळेकर यांचा दोन कोटी रुपयांचा खंडणीसाठी खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोळेकर यांनी सप्टेंबर महिन्यात आरोपींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांकडून तक्रार दिल्याच्या रागातून त्यांचे अपहण करण्यात आले. दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे, असे चोपडे यांनी सांगितले.

indian railways viral video argument between tte and passenger
टीटीईने व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाला सांगितला भलताच कायदा; “सात वर्षांचा तुरुंगवास अन्….”, पाहा संतापजनक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
Former corporator Swapnil bandekar and four arrested
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू

हेही वाचा >>> पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक

पोळेकर गुरुवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी साडेपाचच्या सुमारास सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले होते. पोळेकर सिंहगड पायथा परिसरात नियमित फिरायलाय जायचे. सकाळी दहा वाजल्यानंतर ते घरी परतले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोळेकर यांना काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते. त्यामुळे घाबरलेल्या पोळेकर कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोळेकर यांचा शोध न लागल्याने हवेली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोळेकर यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके तयार केली. पोळेकर कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी योगेश उर्फ बाबू किसन भामे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई

पोळेकर आणि त्यांचा मुलगा प्रशांत यांना आरोपी योगेश भामे याने दोन वर्षांपूर्वी खंडणी मागितली होती. पोळेकर यांना एका रस्त्याचे काम मिळाले होते. या कामात भामेने अडथळा आणला, तसेच काम पूर्ण करुन देण्यासाठी भामेने त्यांच्याकडे दोन कोटींची खंडणी आणि महागडी मोटार मागितली. पोळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिला.

खंडणी न दिल्याने निर्घृण खून

शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांनी दोन कोटींची खंडणी न दिल्याने त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. आरोपी योगेश भामे आणि साथीदारांनी पोळेकर यांचे अपहरण केले. शनिवारी सायंकाळी खडकवासला धरण परिसरात पोळेकर यांच्या मृतदेहाचा काही भाग खडकवासला धरण परिसरात सापडला. मृतदेहाचा उर्वरित भाग छिन्नविच्छन्न अवस्थेत राजगड तालुक्यातील ओसाडे गावात सापडला.

Story img Loader