पुणे : स्वराज्याची राजधानी रायगड येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन – एमटीडीसी) निवासस्थानाचे नूतनीकरण सन २०१७ पासून रखडले आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पावणे चार वर्षांपासून या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.

हेही वाचा >>> पुणे: रस्ते दुरुस्तीसाठी २१७ कोटींच्या खर्चाला पूर्वगणन समितीची मान्यता

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
भूसंपादन कायदा काय आहे? शेतकरी त्यासाठी आंदोलन का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Land Acquisition Act 2013 : भूसंपादन कायदा काय आहे? शेतकरी त्यासाठी आंदोलन का करत आहेत?
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अनेक वर्षे एमटीडीसीची निवास व्यवस्था होती, ज्यामध्ये १२ सूट्स आणि दोन मोठ्या खोल्या (डाॅरमेटरीज) होत्या. यामध्ये मिळून जवळपास १२५ पर्यटकांची निवासाची सोय होत असे. सन २०१७ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या निवास व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याचा घाट घातला. या प्रस्तावाला भारतीय पुरातत्त्व विभागाने सप्टेंबर २०१७ मध्ये मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी शासकीय अनास्थेमुळे जानेवारी २०१९ उजाडला, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे: विनापरवाना जाहिरात फलक, भित्तिपत्रके लावल्यास एक हजार रुपये दंड; दंड न भरल्यास मिळकतींवर बोजा

याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले, की मला माहिती अधिकारात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या पावणे चार वर्षानंतरही निवासस्थानाच्या नूतनीकरणाचे काम अद्याप सुरूच आहे. या नूतनीकरणाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतर येथे निवास व्यवस्था नाही, तर शासकीय कार्यालये सुरू होणार असावीत, असे वाटते. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा स्थापत्य शास्त्राचा एक अद्वितीय नमुना आहे. हा किल्ला बारकाईने बघायला किमान दोन दिवस लागतात. त्यामुळे या ठिकाणी निवास व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र, शासकीय अनास्था आणि नूतनीकरणाची कूर्मगती यामुळे दुर्गप्रेमी शिवभक्त गेली पाच वर्षे या सोयीपासून वंचित आहेत. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात रायगडावर अशी अवस्था असणे हे उद्वेगजनक आहे.

हेही वाचा >>> पुणे: शहरातील निम्मे पथारी व्यावसायिक बेकायदा; २२ हजार ८८९ नोंदणीकृत पथारी व्यावसायिक

नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर

१३ मे २०२२ रोजी महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बांधकामासह संबंधित मालमत्तेचा ताबा पर्यटन महामंडळाकडे हस्तांतरित केला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या १३ सप्टेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये पर्यटन निवास रायगड याचे नूतनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीच्या अनुषंगाने ३१ जानेवारी २०१९ पासून नूतनीकरणाचे काम सुरूच असून ते प्रगतिपथावर आहे, असे पर्यटन महामंडळाच्या जनमाहिती अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा यांनी माहिती अधिकारात सांगितले आहे.

Story img Loader