आपल्या वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अशीच एक टिपणी गुरुवारी पुण्यातील कार्यक्रमात केली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी सभागृहातील प्रेक्षकांना उद्देशून तुम्हाला इंटेलिजंट म्हणू की इंटेलेक्च्युअल असे विचारले आणि इंटेलेक्च्युअल्स लोकांनी मोठे नुकसान केले अशी टिप्पणी केली.
हेही वाचा >>>“चिंचवड पोटनिवडणुकीत यश आलेच पाहिजे”, अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले; म्हणाले, “महाविकास आघाडी..”
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे क्यूएस वर्ल्ड रँकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विन फर्नांडिस यांनी लिहिलेल्या इंडिया नॉलेज सुप्रिमसी – द न्यू डॉन या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सिम्बायोसिसच्यी प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, विद्यापीठाच्या डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजपासून अमृत महोत्सवी वर्ष
कोश्यारी म्हणाले, की विद्यापीठांच्या गुणवत्तेचे नॅकद्वारे मूल्यमापन केले जाते. आपल्याकडे हार्वर्ड, केंब्रिज कसे आहे याचा कुतूहल असते. पण एके काळी भारताची जगात ज्ञानासाठी ओळख होती. स्वामी विवेकानंद, अरविंद यांनी आपले ज्ञान श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले आहे. दुसऱ्यांचे कौतुक करत राहिल्यास आपण संपून जाऊ. आपल्या इतिहासाचे केवळ गौरवीकरण करत राहिले. आपल्याला पुढे जाण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांचे कॅरेक्टर बदलावे लागेल. मातृभाषेत महत्त्व देणे ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुलभूत बाब आहे. आपली संस्कृती, ज्ञान परंपरा मुघल, ब्रिटिश, डच, पोर्तुगिज आपली ज्ञान परंपरा संपवू शकले नाही. आपण ध्येय निश्चित करून काम केल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आपला आपल्या तत्त्वांवर विश्वास असणे आवश्यक आहे.