मोहरमनिमित्त असणाऱ्या शासकीय सुटीत बदल करण्यात आला असून ही सुट्टी गुरुवारऐवजी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना पारपत्र काढण्यासाठी ठरवून दिलेल्या भेटीच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. तसेच पुणे विद्यापीठाच्या १५ तारखेला होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ज्या नागरिकांना पासपोर्ट सेवा केंद्रात १५ तारखेला भेटीसाठी वेळ देण्यात आली आहे, त्यांनी दिलेल्या वेळेलाच परंतु १४ तारखेला केंद्रात भेटीसाठी यावे, असे पारपत्र अधिकारी नरेंद्र सिंग यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.
पुणे विद्यापीठाच्या १५ तारखेला होणाऱ्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून पुढील सर्व परीक्षा झाल्यानंतर शेवटी या विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या विषयीची सविस्तर सूचना विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाला गुरुवारी व शुक्रवारीही सुटी असल्याचे न्यायालयातर्फे कळविण्यात आले आहे.
मोहरमची शासकीय सुटी बदलल्याने पारपत्रासाठी भेटीच्या वेळा आज!
मोहरमनिमित्त असणाऱ्या शासकीय सुटीत बदल करण्यात आला असून ही सुट्टी गुरुवारऐवजी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) घेण्यात येणार आहे.
First published on: 14-11-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt declared holiday for muharram on friday