पुणे : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासासाठी राज्य मंडळाने मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी आणि आणण्यासाठी नियुक्त केलेल्या सहायक परिरक्षकाने (रनर) प्रवासादरम्यान जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक केले असून, परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथकेही नेमली जाणार आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : सेक्सटॉर्शन प्रकरणात मोहोळच्या आमदारांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न , राजस्थानातून एकाला अटक

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्याच्या अनुषंगाने राज्य मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वीय सचिवांसह पोलीस महासंचालक, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य मंडळाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, विभागीय मंडळ अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

हेही वाचा >>> पुणे :शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण : माजी आमदार अनिल भोसले यांची २६ कोटींची मालमत्ता जप्त

परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत या दृष्टीने  शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रावर नेमल्या जाणाऱ्या भरारी पथकांशिवाय जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातून भरारी पथके आणि बैठी पथके नियुक्त केली जाणार आहेत. तसेच मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी आणि आणण्यासाठी नियुक्त केलेल्या सहायक परिरक्षकाने (रनर) प्रवासादरम्यान जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक केले आहे, असे ओक यांनी स्पष्ट केले. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gps based tracking system for transport carry question papers for exams pune print news ccp14 zws