छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवप्रेमीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाच्या वतीने आणि श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊंचे तुळजाभवानी मातेला साकडे,शिवरायांचे पहिले सूर्यदर्शन,शिवरायांचे शस्त्र शिक्षण, अफजल खानाचा वध,बाजीप्रभूंचे शौर्य,भक्ती शक्ती संगम,स्वराज्याची शपथ, रांझ्याच्या पाटलाला कठोर शिक्षा,सुरत स्वारी, पुरंदरचा तह, जिजाऊंना सती जाण्यापासून रोखण्याचा प्रसंग,आग्रा दरबारातील सिंहगर्जना,आग्र्याहून गरुडभरारी, गड आला पण सिंह गेला,आरमाराचे बळकटीकरण,समर्थ रामदास आणि शिवराय, शिवराज्याभिषेक या कथा प्रसंगावर रांगोळ्या साकारल्या असून पुणेकर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर यावेळी आमदार हेमंत रासने, अध्यक्ष राकेश गाडे,हर्षद पाचंगे, महेश जाधव, स्वप्निल पगारिया, शुभम जैन, सारंग भिरंगी, अमेय गाडे, ओमकार भोसले, प्रतीक जाधव, आकाश पाचंगे, निनाद पाचंगे, मयूर भिरंगी, प्रितेश चव्हाण उपस्थित होते.