प्रकाश खाडे, जेजुरी

खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवाव्यात अशी जेजुरीकरांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दर्शन साप्ताहिक एक्सप्रेस या दिल्ली-मिरज गाडीला जेजुरी रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा दिल्याचे जाहीर केले होते. रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी जेजुरी स्थानकावर दर्शन एक्सप्रेसचे आगमन झाले तेव्हा फटाके वाजवून आणि भंडारा उधळून गाडीचे स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष विजय खोमणे, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, अनिल सौंदाडे, जेजुरी भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, माजी नगरसेवक जयदीप बारभाई, सचिन सोनवणे,गणेश आबनावे, जालिंदर खोमणे आणि स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून गाडीचं स्वागत केलं. यावेळी बुंदीचे लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Sharad Pawar on EVM machine
Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन…
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”

जेजुरी रेल्वे स्थानकाचा पूर्ण विकास व्हावा यासाठी या परिसरातील स्थानिक माजी नगरसेवक दिवंगत मेहबूब पानसरे, विजय हरिचंद्रे, तानाजी झगडे, गणेश आबनावे ही मंडळी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करीत होती, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमधून केंद्र शासनाने सुमारे २० कोटी रुपयांची तरतूद करून येथील रेल्वे स्थानकाचे आधुनिकरण केले आहे, येथे अजून विकासकामे सुरू आहेत. दर्शन एक्सप्रेस दिल्लीहून शुक्रवारी रात्री ९.४० वाजता निघणार असून शनिवारी रात्री ७ वाजून ४८ मिनिटांनी जेजुरीत येणार आहे, तर मिरज येथे जाऊन तेथून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी निघून जेजुरीत रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी येणार आहे. २२ तासात ही गाडी मुंबई, बडोदा, रतलाम, कोटामार्गे दिल्लीला पोहोचते. जेजुरीचा खंडोबा साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, परराज्यातूनही या ठिकाणी भाविक देवदर्शनासाठी येतात. या भाविकांना आणि जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजकांना या दर्शन एक्सप्रेसचा चांगला फायदा होणार आहे.

हे ही वाचा >> “यांची निवडून यायची खात्री नाही अन् निघाले…”, विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचा टोला; म्हणाले…

प्रस्तावित वंदे भारत गाडीला जेजुरीत थांबा देण्याची मागणी

रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच वंदे भारत ही रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. दररोज मुंबईहून कोल्हापूरला ही गाडी जाणार असून खंडोबाच्या दर्शनाला येणारे भाविक, पर्यटक आणि उद्योजकांसाठी श्रीक्षेत्र जेजुरी येथे या गाडीला थांबा द्यावा, सर्वच एक्सप्रेस गाड्या येथे थांबवाव्यात अशी मागणी खंडोबा देवस्थान, जेजुरी उद्योजक संघटना (जिमा) आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.