मुलापासून विभक्त झालेल्या सुनेने नातीला भेटू न दिल्याने ज्येष्ठ नागरिकाने चार वर्षांपूर्वी इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सून शालिनी उर्फ शिवानी, तिची आई मनीलता शर्मा, मेहुणा शेखर शर्मा (तिघे रा. बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप नामदेव सरोदिया (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप सरोदिया न्यायाधीश आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : येरवडा भागात भरदिवसा घरफोडी १० लाखांचा ऐवज चोरला

संदीप सरोदिया आणि त्यांची पत्नी शालिनी यांच्यात कौटुंबिक वादातून घटस्फोट झाला आहे. सरोदिया यांचे वडील नोव्हेंबर २०१८ मध्ये नातीला भेटण्यासाठी विभक्त झालेल्या सुनेच्या घरी गेले होते. त्या वेळी सरोदिया यांचे वडील नामदेव यांना धक्काबुक्की करुन घराबाहेर काढण्यात आले होते. नामदेव आजारी होते. नातीला भेटण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, आरोपींनी त्यांना भेटू दिले नाही. नामदेव यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांनी इमारतीतील चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. नामदेव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

हेही वाचा- पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

त्या वेळी पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली होती. चिठ्ठी तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील अहवालनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप सरोदिया यांची आई आजारी होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandfather committed suicide after daughter in law did not allow him to meet his grandson pune print news dpj