|| दत्ता जाधव

‘अपेडा’कडून वेळेत कार्यवाही झाली नसल्याचा द्राक्ष बागायतदार संघाचा आरोप

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले

पुणे : चीनने द्राक्ष आयातीबाबत दिलेल्या दिशानिर्देशांवर वेळीच कार्यवाही न झाल्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम आता मध्यावर आला, तरीही चीनला अद्याप द्राक्ष निर्यातच सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने या बाबत शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात विकास एजन्सीच्या (अपेडा) हलगर्जीबाबत तीव्र नापंसती व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार म्हणाले,की २०२० मध्येच चीनने द्राक्ष निर्यातीबाबत दिशानिर्देश दिले होते. द्राक्ष उत्पादक शेतकरी, शीतगृह आणि निर्यातदारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर काय-काय काळजी घेतली पाहिजे, या बाबत सविस्तर निर्देश दिले होते. केलेल्या उपाययोजनांचे चित्रीकरण करून ते चीनच्या संबंधित यंत्रणेला पाठवायचे होते. चीनची यंत्रणा ऑनलाइन संबंधित शेतकरी, शीतगृह आणि निर्यातदारांची तपासणी करणार होती. मात्र, अपेडाने या बाबतची माहिती द्राक्ष बागायतदार संघ आणि निर्यातदारांना दिलीच नाही. मागील करोना काळात निर्यातीला अडचणी आल्या होत्या, तरीही काही कंटेनर चीनला गेले. मात्र, यंदा तपासणी केल्याशिवाय आयात करणार नसल्याची भूमिका चीनने घेतली होती. त्यामुळे अद्यापपर्यंत चीन होणारी निर्यात सुरूच झालेली नाही. आता द्राक्ष हंगाम मध्यावर आला आहे, तरीही शेतकऱ्यांना चीनला होणाऱ्या निर्यातीची प्रतीक्षाच आहे.

चीनला होणारी निर्यात का फायद्याची?

चीनला हिरव्या रंगाच्या लांब (सुपर, एसएस, अनुष्का या जातींची) मण्यांची आणि काळी (जम्बो) द्राक्षे निर्यात होतात. ही द्राक्षे युरोपला जात नाहीत. या द्राक्षांची निर्यात काही प्रमाणात रशियाला होते. यंदा युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाला होणाऱ्या निर्यातीला वेग आलेला नाही. चीनला लांब द्राक्षांची मोठय़ा प्रमाणावर निर्यात होत असल्यामुळे या मालाचा उठाव होऊन देशांतर्गत बाजारपेठेत दर वधारत होता. मात्र, निर्यात बंद असल्याने यंदा लांब मण्यांच्या द्राक्षांचे दर प्रती किलो सुमारे दहा रुपयांनी पडले आहेत. चीनला करोना काळातही सरासरी २५०० टनांची निर्यात झाली होती. त्यातून शेतकऱ्यांना सुमारे ४० कोटी रुपये मिळाले होते. यंदा त्यात वाढ अपेक्षित होती, मात्र अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

१५ मार्चपासून तपासणी

जानेवारी २०२२मध्ये चीनकडून दिशानिर्देश मिळाले होते. त्यानुसार सर्व संबंधितांना कळविण्यात आले होते. आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. शेतकरी, शीतगृह आणि निर्यातदारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. १५ मार्चपासून दूरदृश्य प्रणालीद्वारे बागा, शीतगृह आणि निर्यातसुविधांची तपासणी सुरू होणार आहे. तपासणीनंतर चीनला निर्यात सुरू होईल, अशी माहिती अपेडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. मार्च महिन्यात निर्यात वेगाने होत असते. आता दहा तारखेनंतर निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. यंदा चीनला चांगली निर्यात झाली असती, मात्र अपेडाच्या निष्काळजीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

— शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

आता लवकरच निर्यात सुरू करणार आहोत. पुढील महिन्याभरात सरासरीइतकी निर्यात करण्याचा प्रयत्न असेल. काळय़ा द्राक्षांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. – गोविंद हांडे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग

Story img Loader