पुणे : दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला फटका बसला असून, बाजारात आवक कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलो भाव मिळत आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य शहरांतील बाजारात शेवग्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. शेवग्याची सर्वाधिक लागवड तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. एरवी भाव १०० ते १२० रुपये किलोंच्या आसपास असणाऱ्या शेवग्याला दक्षिणेकडील परतीच्या पावसाचा फटका बसला असून घाऊक बाजारात १० किलोचा दर ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत गेला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शेवग्याची आवक घटली आहे. डिसेंबरअखेरीस आवक वाढल्यानंतर दरात घट होईल, असे व्यापारी रामदास काटकर यांनी सांगितले.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?

हेही वाचा >>> पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

भावखाणाऱ्या शेंगांकडे ग्राहकांची पाठ

शेवगा उष्ण असल्याने थंडीत मागणी वाढते, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली. मात्र किरकोळ बाजारात पावशेर शेवग्याचा दर १२० ते १५० रुपये असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे मागणीही घटल्याचे काही व्यापारी सांगत आहेत.

Story img Loader