पुणे : दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला फटका बसला असून, बाजारात आवक कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलो भाव मिळत आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य शहरांतील बाजारात शेवग्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. शेवग्याची सर्वाधिक लागवड तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. एरवी भाव १०० ते १२० रुपये किलोंच्या आसपास असणाऱ्या शेवग्याला दक्षिणेकडील परतीच्या पावसाचा फटका बसला असून घाऊक बाजारात १० किलोचा दर ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत गेला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शेवग्याची आवक घटली आहे. डिसेंबरअखेरीस आवक वाढल्यानंतर दरात घट होईल, असे व्यापारी रामदास काटकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
‘भाव’ खाणाऱ्या शेंगांकडे ग्राहकांची पाठ
शेवगा उष्ण असल्याने थंडीत मागणी वाढते, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली. मात्र किरकोळ बाजारात पावशेर शेवग्याचा दर १२० ते १५० रुपये असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे मागणीही घटल्याचे काही व्यापारी सांगत आहेत.