पुणे : स्त्रीशिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांना शुक्रवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. समता भूमी येथे विविध नेत्यांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.दलित सेनेतर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील यादव, जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, वसंतराव बोले, प्रदीप गायकवाड, शशिकांत कांबळे या वेळी उपस्थित होते. भीमांश क्रांती सेनेतर्फे अध्यक्ष प्रेमनाथ जोगदंड यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. हनीफ शेख, कुमार पिल्ले, राजू होळकर या वेळी उपस्थित होते.
एकता सेवा प्रतिष्ठानतर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला, सचिन खंडागळे, विशाल कुलकर्णी, गणेश तावडे, महेश साळुंखे या वेळी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे गंज पेठेतील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले. पक्षाचे नरेश जाधव, राहुल तांबे, अनिल अग्रवाल, दिनेश अर्धाळकर, दिनेश परदेशी या वेळी उपस्थित होते. झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे महात्मा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दलाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष महंमद शेख, सुरेखा भालेराव, सतीश कांबळे, वंदना पवार, गणेश लांडगे, दिना शेखर, दीपक आटोळे, अरूणा तांडगे या वेळी उपस्थित होते.
प्रियदर्शनी शिक्षण संस्थेतर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष महेश कुंभार, शशिकला कुंभार, वर्षाराणी कुंभार या वेळी उपस्थित होत्या.बहुजन विकास आघाडीतर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष धनंजय घोलप, अरविंद बहुले, सनी रायकर, मच्छिंद्र सुपेकर, उमेश तेजी या वेळी उपस्थित होते.प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी, सोनिया ओव्हाळ, सुनीता नेमूर, बेबी राऊत या वेळी उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे महात्मा फुले मंडईतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पक्षाच्या मृणालिनी वाणी, गायत्री लडकत, शांता नेवसे, सुचित्रा बंडगर, स्मिता लडकत, फिरोजा शेख या वेळी उपस्थित होत्या.शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. जिल्हा सरचिटणीस मनोज शेलार, योगेश पवार, भरत मिसाळ, सुजाता होले, गंधर्व कांबळे, मनीषा लांडगे या वेळी उपस्थित होते. ‘संविधान ग्रुप’च्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. संस्थापक सचिन गजरमल, राष्ट्रीय अध्यक्ष राकेश सोनावणे, प्रदेश संघटक प्रवीण सोनवणे, शहराध्यक्ष नागेश लांडगे, उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे या वेळी उपस्थित होते.