बऱ्याचशा नाटय़मय घडामोडी व अनेक अडचणींवर मात केल्यानंतर चापेकर बंधूंच्या चिंचवडगावातील समूहशिल्पाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून २६ जानेवारीला चौथऱ्याच्या कामाचा प्रारंभ होत आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
चिंचवड गावात सहा रस्ते एकत्र येणाऱ्या मुख्य चौकात महापालिकेने भव्य उड्डाणपूल उभारला आहे. तत्पूर्वी, तेथे चापेकरांचा ६५ फुटी उंच मनोरा होता. रस्ता रुंदीकरणात तो हटवण्यात आला. उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर याच चौकात शिल्पसमूह उभारण्याचा निर्णय झाला. २५ ऑगस्ट २०१० मध्ये भूमिपूजन झाले. सुरुवातीला अतिशय संथपणे काम सुरू होते, त्यात चौथऱ्याची व मूर्तीची उंची कमी असल्याचे नंतर लक्षात आले. एवढय़ा मोठय़ा चौकात हे शिल्प झाकोळून जाणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. त्यात सुधारणा करण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार, आधीच्या रचनेत बदल झाला. आता पुतळ्यांची उंची वाढवण्यात आली आहे. नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या कामासाठी ४७ लाख रुपये तर चौथऱ्यासाठी स्वतंत्रपणे ५० लाखांची तरतूद करण्यात आली. रविवारी (२६ जानेवारी) दुपारी चार वाजता महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते चौथऱ्याचे भूमिपूजन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा