बालदिनाचे औचित्य साधून १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शालेय भूजल सप्ताह राबविण्यात येणार आहे. भूजल योजनेची शपथ घेणे, अटल भूजल योजनेची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. पाणी या विषयावर निबंध, घोषवाक्ये किंवा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. पुरंदरमधील ३६ ग्रामपंचायती ४१ गावे, इंदापुरातील तीन ग्रामपंचायती तीन गावे, बारामतीमधील ६७ ग्रामपंचायती ७३ गावे अशा एकूण १०६ ग्रामपंचायतींमधील ११८ गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर गावांत या योजनेबाबत जनजागृती होण्यासाठी माहिती शिक्षण संवाद आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार गावामधील महिला, युवक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुण्यात ‘हर हर महादेव’ सिनेमाच्या शो ला मनसेकडून संरक्षण

पाणी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, शालेय जलदूत गटाची नियुक्ती करण्यात येणार असून या माध्यमातून शाळेतील पाण्याचे नळ बंद करणे, पाणी वाया जाऊ न देणे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याबाबत अभिनव उपक्रम राबविणे आदी कामे केली जातील. जलदिंडीचे आयोजन आदी विविध उपक्रम या सप्ताहात आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.या सर्व उपक्रमांची छायाचित्रे, अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे पुण्यातील मुख्यालयात पाठवावेत. अधिक माहितीसाठी शुभांगी काळे ८१४९४२६०७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.