पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात असणाऱ्या सिंहगड महाविद्यालयात एका टोळक्यानं तुफान राडा घातला आहे. सराईत आरोपीसह काही जणांनी महाविद्यालयातील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा होत असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालयाच्या आवारात दहशत पसरली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विकास उर्फ विकी जितेंद्र चावडा (वय २९, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), साहील प्रमोद गायकवाड (वय १९, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रुक), चेतन संतोष थोरे (वय १९, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) आणि मोहन धर्मा राठोड (वय १९, रा. पठाण वस्ती, वडगाव बुद्रुक) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अन्य सहा साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
forest tiger hunt marathi news
वाघाच्या शिकारीचे धागेदोरे सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यापर्यंत !
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
gangster subhash singh to bring in vasai in samay chauhan murder case after discharge from hospital
गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर अखेर कारागृहात; समय चौहान हत्याकांडात वसईत आणण्याचा मार्ग मोकळा
Kasarshirambe , hunter , leopard , Satara ,
सातारा : शिकारीचा सापळा लावणाऱ्या ऊसतोड मजुरांवर गुन्हा, सापळ्यात अडकलेल्या बिबट्याची शेतात धूम
Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
Akola , Bangladeshi Rohingya, Birth Certificate,
दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

अथर्व चौधरी असं मारहाण झालेल्या १९ वर्षीय फिर्यादी तरुणाचं नाव आहे. तो धनकवडी परिसरातील रहिवासी असून सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात येत होता. दरम्यान सराईत गुन्हेगार विकास चावडा आणि त्याचे साथीदार महाविद्यालयाच्या आवारात घुसले. त्यांनी अथर्वच्या मोबाइल क्रमांकावर फोन करून त्याला बोलावून घेतलं.

यानंतर त्यांनी अथर्वला दमदाटी करण्यास सुरुवात केली. ‘मी कॉलेजचा भाई आहे. तू आमचं ऐकत नाहीस ’ असं म्हणत आरोपी चावडा आणि त्याच्या साथीदारांनी अथर्वला बेदम मारहाण केली. ऐन ट्रॅडिशनल डेच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अथर्वने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे करत आहेत.

Story img Loader