पिंपरी : पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली आहे. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी जाहीरपणे बोलू शकत नसल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबत भीतीदायक भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकुर्डीतील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कठीण गुन्हे उघडकीस आणत आहेत. पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी जाहीरपणे बोलू शकत नाही. पोलिसांवर उलट गोळीबार झाला. त्यात दोघे पकडले. एकजण पळाला. परत त्याला पकडले. अशा गोष्टी पोलीस विभागात होत असतात.

हेही वाचा – पालकमंत्र्यांची पोलीस आयुक्तांना प्रेमळ तंबी, म्हणाले पत्नी…

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या सोयी सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून ४० कोटी दिले आहेत. लोक सहभागातून ६० कोटी रुपये मिळवून देणार आहे. पुणे शहरात १०० पोलीस चौक्या आहेत. त्यांची अवस्था बिकट आहे. पंखे खडखड करत असतात. पुणे पोलिसांनी चोरीचा हस्तगत केलेला सात कोटींचा मुद्देमाल न्यायालयातून सोडवून नागरिकांना परत केला. पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.

हेही वाचा – असियान व्यापार आयुक्तपदी डॉ. सचिन काटे; व्यापार वाढविण्यासाठी पुण्यात कार्यालयही सुरू

ड्रग्ज व्यवसायाचा नायनाट करा

मारामारी झाली. चोरांना पकडले हे चालत राहील. परंतु, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे. ड्रग्जवाले तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे ड्रग्जवाल्यांवर कडक कारवाई करावी. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत. दामिनी पथक अतिशय सक्षम आहे. पथकाला अधिकार; तसेच दुचाकी, चारचाकी वाहने द्यावीत. या गोष्टींवर लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी पोलीस आयुक्तांना केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister chandrakant patil said a big link of terrorists has been found in pune pune print news ggy 03 ssb