पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १७० वर पोहोचली आहे. जीबीएसच्या ६१ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ६२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने जीबीएस उद्रेक झालेल्या परिसरातील पाणी आणि चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर दिला आहे.

राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १६२ रुग्ण आहेत. त्यात पुणे महापालिका ३३, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे ८६, पिंपरी-चिंचवड महापालिका २२, पुणे ग्रामीण २१ आणि इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागांतील १७३ पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ३३ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News LIVE Updates : “मंत्री धनंजय मुंडे यांच्या दबावात महायुती सरकार का चालतं?” विजय वडेट्टीवारांचा सवाल
Guillain Barre syndrome
Guillain Barre Syndrome: ‘जीबीएस’ वाढीचे कारण सापडले, एनआयव्हीचा अहवाल आला !
alandi illegal warkari educational institutes
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांच्या तपासणीसाठी २० समित्यांची स्थापना; आज, उद्या तपासणी
BMC Budget 2025 Latest Updates in Marathi
अग्रलेख : किती काळ…?
shirdi sai baba darshan prasad
Shirdi Sai Baba Trust: शिर्डीत मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांचा त्रास, साईबाबा संस्थानानं भोजन प्रसादाबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

महापालिकेकडून नांदेडगाव परिसरातील चिकनचे १८२ नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर अन्न औषध व प्रशासनाने नांदेड गाव परिसरातील हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत. याचबरोबर रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य विभागाकडून रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. पुणे महापालिकेने ५४ हजार ३४ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९ हजार २३२ आणि पुणे ग्रामीणने १३ हजार ८९ अशा एकूण ७७ हजार ३५५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

जीबीएस रुग्णसंख्या

एकूण रुग्ण – १७०
रुग्णालयात दाखल – १०९
अतिदक्षता विभागात दाखल – ६१
व्हेंटिलेटरवरील रुग्ण – २०
बरे झालेले रुग्ण – ६२
एकूण मृत्यू – ५

वयोगटनिहाय रुग्णसंख्या

वयोगट – रुग्ण
० ते ९ – २२
१० ते १९ – २३
२० ते २९ – ३८
३० ते ३९ – २१
४० ते ४९ – २२
५० ते ५९ – २५
६० ते ६९ – १४
७० ते ७९ – २
८० ते ८९ – ३
एकूण – १७०

Story img Loader