पिंपरी : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च अधिक आहेत, असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. कट्टर शिवसैनिकांनी वाढविलेल्या पक्षाचा संजय राऊत यांनी सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी चिंचवड येथील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभागृह नेते नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा

मंत्री पाटील म्हणाले, की मोदी पंतप्रधान होऊ नयेत, असे फक्त पाकिस्तानला आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांना वाटते. पण देशातील सर्वसामान्य जनतेला मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते. त्यामुळे मोदींना मतदान करा, आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, ही मोदींची हमी आहे. ज्यांच्याकडे पाच-दहा खासदारही नाहीत, ते इंडिया आघाडीतील नेतेही पंतप्रधान झाल्याचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहात आहेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जीवावर उदार होऊन पक्ष वाढवला, पण ते विनाकारण आम्हालाच बदनाम करीत आहेत. गद्दार, गद्दार म्हणून हिणवत आहेत. संजय राऊत यांनी पक्षाचा सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – बारामतीत पहिल्या चार तासांत किती मतदान? जाणून घ्या सविस्तर

काँग्रेसने कायम मतांचे राजकारण केले. भांडण लावून लोकांना येडे बनविले. आता मोदींविषयी चुकीचे चित्र उभे करून मतदारांमध्ये भीती निर्माण करीत आहेत. पण हे आता चालणार नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत झालेली देशाची प्रगती सर्वांनीच पाहिली आहे. त्यामुळे मोदी हेच पंतप्रधान होणार, हे खुद्द काँग्रेसवालेही मान्य करतात, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil criticizes congress pakistan and congress think modi should not become prime minister again statement by minister gulabrao patil pune print news ggy 03 ssb