गोड खाणं ज्यांना मनापासून आवडतं त्यांच्यासाठी हे ठिकाण आहे. आपल्यासमोरच इथे गरम गरम जिलेबी तयार होते. नंतर ती पाकात टाकली जाते आणि थोडय़ा वेळाने गरम जिलेबीचा बाऊल घट्ट रबडीबरोबर आपल्या पुढय़ात येतो. जिलेबी रबडीअशी ही इथली डिश खूप लोकप्रिय आहे.

खाण्याच्या काही काही ठिकाणांची कल्पना आपण अनेकदा त्या ठिकाणाच्या दिसण्यावरून करतो. अर्थात अनेकदा त्यात फसगतही होते. म्हणजे साधसं दिसणारं एखादं ठिकाणही खूप काही चांगलं असल्याचं लक्षात येतं. अगदी साध्या दिसणाऱ्या एखाद्या टपरीत किंवा टपरीवजा हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवर किंवा एखाद्या स्नॅक सेंटरमध्येही काही वेळा खूप मस्त बेत जमून जातो. तिथल्या चवीवर आपण खूश होऊन जातो. आपण बालगंधर्व रंगमंदिराकडून घोले रस्त्यावर आलो की लगेच उजव्या हाताला ओळीनं जी दुकान आहेत त्यातच आपल्याला दिसतं गुरुकृपा स्नॅक्स. इतर अनेक स्नॅक्स सेंटर असतात तसंच हे एक ठिकाण आहे. एकूण रंग-रुप, आकार, बैठक व्यवस्था, दुकानाची मांडणी सगळं इतरांसारखंच आहे. पण इथल्या काही पदार्थाची चव चाखायला अनेक मंडळी इथे आवर्जून येतात. ज्यांना गोडाची आवड आहे त्यांच्यासाठी तर इथे एक मस्त डिश आहे. शुद्ध तुपातली जिलेबी आणि रबडी ही इथली खासियत. घोले रस्त्याच्या अगदी सुरुवातीला हे स्नॅक्स सेंटर आहे. या स्नॅक्स सेंटरमध्ये लावलेला जिलेबी रबडीचा फलक नेहमीच जाणाऱ्या-येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही

जिलेबीसाठी काही ठिकाणं पुण्यात खूप प्रसिद्ध आहेत. काही हिंदी मंडळींनी हल्ली पुण्यात काही चौकांमध्ये जिलेबी विक्री सुरू केली आहे. गजबजलेल्या चौकांमध्ये त्यांचे छोटे ठेले हल्ली दिसतात. गॅसची शेगडी आणि तिच्यावर मोठी कढई बसेल एवढीच जागा ही मंडळी व्यापतात आणि रस्त्याच्या कडेला यांची जिलेबीची दुकानं प्रामुख्यानं दुपारनंतर लागतात. काही जण हल्ली हातगाडी देखील लावू लागले आहेत. या मंडळींच्या ठेल्यावर ताजी, गरम जिलेबी आपल्यासमोरच तयार होते. त्यामुळे त्यांच्याकडे गर्दीही चांगली असते. मात्र रबडी बरोबर जिलेबी खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तो या स्नॅक्स सेंटरमध्ये मिळतो. शंकर धामुणसे आणि दीपक पोळ यांच्या या हॉटेलमध्ये इतरही अनेक चविष्ट पदार्थ असतात, पण मुख्य आकर्षण जिलेबी-रबडीचं आहे. भोर जवळ असलेलं मसहर हे या दोघांचं गाव.

उत्तम चवीचे पदार्थ विकता विकता काही महिन्यांपूर्वी या स्नॅक सेंटरमध्ये जिलेबी-रबडीही सुरू झाली. इथल्या जिलेबीचं वैशिष्टय़ं हे, की ती या हॉटेलमध्ये लावलेल्या बोर्डप्रमाणे खरोखरच शुद्ध तुपात तयार केली जाते. खाणाऱ्याला सहजच ती चव लक्षात येते. दुसरं एक वैशिष्टय़ं म्हणजे जिलेबी कधीही तयार करून ठेवली जात नाही.

तुम्ही जाऊन अगदी एक प्लेट जिलेबी-रबडीची ऑर्डर दिली तरी इथली मंडळी लगेच जिलेबी तळायला घेतात. आधी जिलेबीचं पीठ फडक्यात घेतलं जातं. नंतर मोठय़ा कौशल्यानं जिलेबी तयार करण्याचं काम सुरू होतं. गरम गरम तेलात जिलेबीचे वेढे पडत असतात. पुढे ते वेढे साखरेचा पाक असलेल्या कढईत टाकले जातात आणि नंतर ही गरम जिलेबी थंड रबडीबरोबर बाऊलमध्ये दिली जाते. रबडीचा दाटपणाही या वेळी आपल्या लक्षात येतो.

आकारानं छोटय़ा अशा या जिलेब्या कुरकुरीत आणि किंचित कडक अशा असतात. या हॉटेलमध्ये इतरही काही पदार्थ आवर्जून घेतले जातात. त्यात मुख्यत: मिसळ, पावभाजी, तवा पुलाव, वडा यांचा समावेश करता येईल. र्तीदार मिसळ इथे दिवसभर मिळते. फरसाण आणि झणझणीत रस्सा त्याच्याबरोबर पाव अशी ही मिसळ असते.

पावभाजी, तवा पुलाव या डिश इथे दुपारी बारापासून मिळतात. या शिवाय इडली, वडा, पाव पॅटिस, सॅंडविच, ग्रिल सँडविच, भजी, पोहे, उपीट, सामोसा हे पदार्थही इथे असतात. त्यातल्या नाश्त्याच्या पदार्थाना सकाळपासूनच मागणी असते आणि दुपारनंतर पावभाजी, पुलावसाठी गर्दी झालेली दिसते.

गुरुकृपा स्नॅक्स

  • कुठे : घोले रस्ता, बालगंधर्व रंगमंदिराजवळ
  • कधी : सकाळी सात ते रात्री नऊ

Story img Loader