पिंपरीतून दुबईला पाठविण्यासाठी आणलेला चार लाखांचा गुटखा पिंपरी पोलिसांच्या तपास पथकाने शनिवारी रात्री पकडला. याप्रकरणी एका व्यक्तीस अटक केली आहे.
अशोक अर्जनदास रामनानी (वय ४६, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा  अधिकारी रवींद्र नागवेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रामनानीवर गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख यांना पिंपरी कॅम्पात एका व्यक्तीकडे गुटखा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस कर्मचारी दिनकर गावढे, शिवराज कलांडीकर, आनंद भोरकडे, फीईम सय्यद यांच्या पथकाने सापळ रचला. रामनानी यांच्या घरावर शनिवारी छापा टाकला असता घरामध्ये तीन पोत्यांत गुटखा असल्याचे आढळून आले. या गुटख्यातील किंमत चार लाख रुपये आहे. तो हा गुटखा दुबई येथे पाठविणार असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. त्याने हा गुटखा कोठून आणला याचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader