लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : शहरात गुटख्याची राजरोस विक्री होत असून, ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाका परिसरात कर्नाटकातून पुण्यात विक्रीस पाठविलेला एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकासह दोघांना अटक केली.
मल्लमा भिमाया दौडमनी (वय ३१, सध्या रा. कात्रज, मूळ, रा. मदगुनकी कर्नाटक), तुषार दीपक घोरपडे (वय २६, रा. जांभुळवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. त्यांचे साथीदार स्वप्रील भालशंकर, बबलु पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अक्षय सुभाष नलावडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका परिसरातील शिवरे गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.
राज्यात गुटखा, पानमसाल, सुगंधित तंबाखू विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. शहर, तसेच परिसरातून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीस पाठविण्यात येत आहे. बाह्यवळण मार्गावरुन गुटखा वाहतूक करणारा ट्रक निघाल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास शिवरे गावाजवळ सापळा लावण्यात आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. टेम्पोतून एक कोटी १५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. टेम्पोचालकासह साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत पुण्यातील आरोपींचे साथीदार बबलू भालशंकर आणि स्वप्नील पाटील यांच्याकडे गुटख्याचा साठा सोपविण्यात येणार होता असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि पथकाने ही कारवाई केली.