पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थित असलेले हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तुपे आता घूमजाव करून अजित पवार यांना पाठिंबा जाहीर करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी लगेचच अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> अजित पवारांसोबत काम करताना अडचण येईल असं वाटत नाही- भाजप आमदार महेश लांडगे

मात्र हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीला चेतन तुपे अनुपस्थित होते. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यानंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीत शरद पवार यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीला चेतन तुपे उपस्थित राहिले होते. मात्र गुरुवारी तुपे यांनी अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, मी कोणाच्या बैठकीला गेलो होतो, कुठे होतो ते पडद्यावर दिसले होते. उद्या कुठे असेन, तेही पडद्यावर दिसेल, अशी प्रतिक्रिया चेतन तुपे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.