पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वांत अधिक मतदारसंख्या असलेल्या हडपसर मतदारसंघामध्ये सर्वांत कमी मतदान झाले. या मतदारसंघात काही ठिकाणी मतदानासाठी नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत असताना अनेक मतदान केंद्रांवर मात्र निरुत्साह दिसत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संथ गतीने येथे मतदान सुरू होते. दुपारी चारनंतर झोपटपट्टी भागातील नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्याने काही केंद्रांवर गर्दी होऊन मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हडपसर मतदारसंघात सहा लाख २५ हजार ६७५ मतदार आहेत. यापैकी पुरुष तीन लाख २८ हजार ०८२, तर महिला दोन लाख ९७ हजार ५१५ इतक्या आहेत. पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ४७.२३ टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा फायदा मतदान वाढण्यास झाल्याचे दिसले नाही.
आणखी वाचा-चिंचवड, भोसरीत उत्साह, तर पिंपरीत निरुत्साह
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने प्रशांत जगताप, महायुतीने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांना, मनसेने पक्षाचे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली होती. तर, गंगाधर बधे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार महादेव बाबर यांनी बधे यांना पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या सभा झाल्या. मतदारसंघात चौरंगी लढत होत असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशील होते. मात्र, मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही.
आणखी वाचा-कसबा शहरात सर्वाधिक मतदानाचा वाढलेला मतटक्का उमेदवारांची धडधड वाढविणारा
मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत या मतदारसंघाचा मतदानाचा टक्का इतर मतदारसंघाच्या तुलनेत कमीच राहिला. दुपारी एकनंतर गर्दीला सुरुवात झाली. काही मतदान केंद्रे अक्षरश: ओस पडली होती. झोपडपट्टीचा भाग असलेल्या वैदुवाडी महात्मा फुले वसाहत, तसेच रामटेकडी परिसरामधील काही मतदान केंद्रांवर दुपारीही गर्दी होती. सोसायट्यांमधील मतदारांपेक्षा झोपडपट्टीमधील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. अनेक मतदान केंद्रांवर पाळणाघर आणि लहान मुलांसाठी सोय केली होती. काही मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मतदारांची गैरसाेय झाली. मतदानाची मुदत सायंकाळी सहा वाजता संपली, तरी काही केंद्रांवर रांगा लागल्याने सहानंतरही मतदान सुरू होते.