पुणे : शहरातील सर्वाधिक मतदारसंख्या अशी ओळख असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. मतमोजणीच्या दिवशी देखील या मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या घडामोडीमुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे या मतदारसंघाचा आतापर्यंत असलेला इतिहास बदलला. राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी लढत येथे झाली.

विद्यमान आमदारांना बाजूला करून विधानसभेमध्ये नवीन उमेदवाराला संधी देण्याची हडपसरकरांची परंपरा आहे. मात्र यंदाच्या वर्षी ही परंपरा खंडित झाली. अखेरच्या टप्प्यात अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा विजय झाला. हडपसरमधून सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान तुपे यांना मिळाला. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा सात हजार मतांनी पराभव केला.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

हेही वाचा – Pune District Nota Votes : पुणे जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना ४७ हजार मतदारांनी नाकारले

पाच वर्षांपूर्वी झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत चेतन तुपे यांना ९२ हजार ३२६ मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पावणेतीन हजार मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाविकास आघाडीने हडपसरची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सोडण्यात आली. या मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेकडून शहर प्रमुख साईनाथ बाबर यांनी निवडणूक लढविली तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर गंगाधर बधे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून चेतन तुपे यांनी आघाडी घेतली होती. पंधराव्या फेरीपर्यंत तुपे यांची आघाडी चांगलीच वाढली होती. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी त्यांची आघाडी कमी करत जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे निकालात रंगत निर्माण झाली होती. हडपसरमध्ये एकाच उमेदवाराला दोनवेळा संधी मिळत नाही, असा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे हडपसरकर आपला कौल कोणाच्या बाजूने देणार याबाबत अखेरच्या क्षणापर्यंत मोठी उत्सुकता होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये सात हजारांचे मताधिक्य घेत तुपे यांनी विजय मिळविला.

हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्र : बालेकिल्ल्यात काँग्रेस भुईसपाट, ७० जागांपैकी ५६वर महायुती, पुण्यात अजित पवारच ‘दादा’

ठळक मुद्दे…

  • अत्यंत चुरशीची लढत
  • कमी मतफरकामुळे फेरमतमोजणीची मागणी
  • फेरमतमोजणी दरम्यान प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आक्रमक
  • शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या बंडखोर उमेदवाराचा फटका

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

चेतन तुपे – १,३४,८१०

प्रशांत जगताप – १,२७,६८८

अखेर इतिहास घडला. हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, हा माझा शब्द आहे. – चेतन तुपे, आमदार, हडपसर

Story img Loader