लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मगरपट्टा सिटीतील चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.पतीने जाब विचारल्याने त्याला शिवीगाळ करुन धमकावले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली.
मोहम्मद आदिल (वय २२), अफजल अली आणि अन्य एकाला अटक करण्यात आली. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि पती मगरपट्टा सिटी परिसरातील चित्रपटगृहात गेले होते. आरोपी मागील रांगेत बसले होते. चित्रपट सुरू झाल्यानंतर आरोपींनी महिलेशी अश्लील वर्तन केले.
महिलेच्या पतीने तिघांना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी पतीला शिवीगाळ करुन धमकावले. महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली.