पुणे: चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे अगदी दोन-तीन दिवस वगळता थंडीच्या हंगामातील निम्मा डिसेंबर थंडीविना गेला आहे. सध्याही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह संपूर्ण राज्यात अनेक भागांत दिवसा आणि रात्रीही उकाडा जाणवतो आहे. मात्र, राज्यातील ढगाळ स्थिती दूर होऊन आता कोरड्या हवामानाचे वेध लागले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत तापमानात काही प्रमाणात घट होऊन हळूहळू गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिसेंबरच्या सुरुवातीपासून राज्यात अंशत: ढगाळ हवामानाच्या स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ होत राहिली. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहिले आणि बहुतांश वेळेला हवेत उकाडाच जाणवला. ९ आणि १० डिसेंबरलाच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवल्याने राज्यभरातील तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, ही थंडी अल्पकाळाची ठरली. हा अल्प कालावधी वगळता डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी जाणवली नाही. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मंदौस चक्रीवादळाचा या महिन्यात थंडीवर सर्वाधिक परिणाम झाला.

हेही वाचा >>> पुणे: पुस्तकांच्या छायांकित प्रतींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई

चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन त्याने महाराष्ट्रावर परिणाम केला. राज्याच्या बहुतांश भागांत ढगाळ स्थिती तयार झाली. त्याचप्रमाणे काही भागांत हलक्या पावसाने हजेरीही लावली. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये थंडी पूर्णपणे गायब झाली होती. अनेक भागांत रात्रीच्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ८ ते १० अंशांनी वाढला होता. तापमानातील ही वाढ सध्याही कायम आहे. गुरुवारीही राज्याच्या सर्व भागामध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. मुंबई परिसरात तापमानाचा पारा ४ ते ५ अंशांनी वाढला आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, गोंदिया आदी भागातही रात्रीच्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५ ते ८ अंशांनी अधिक आहे.

हेही वाचा >>> पुणे:भोरमध्ये नदीपात्रात विद्युत पंप सोडताना विजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पुढे काय होणार?

राज्यातील तापमानात पुढील २४ तास फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट होईल. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तर राजस्थान, पंजाब आदी राज्यांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता आहे. या भागातून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहण्याचा अंदाज आहे. या वेळेला महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. परिणामी पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होऊन गारवा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.