बारामती : – गेली दोन वर्ष बारामतीच्या वैभवात भर पडेल अशा बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शरयू फाउंडेशन च्या वतीने केले जात आहे, शरयू फाउंडेशन यांचे हे तिसरे वर्ष असून १६ फेब्रुवारी (रविवार २०२५ ) रोजी एकवीस  किलोमीटर दहा  किलोमीटर आणि तीन  तीन किलोमीटर धावण्याच्या शर्तीचे आयोजन करण्यात आले असल्याचे शरयू फाउंडेशनचे अध्यक्ष सौ. शर्मिला पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेसाठी तीनही गटांमध्ये  ४,५०० स्पर्धकांची नोंदणी झालेली आहे, तीन किलोमीटर विद्यार्थ्यांची  अडीच हजाराच्या वर  नोंदणी झाल्याने सध्या नोंदणी थांबविण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला असल्याची माहिती शरयू फाउंडेशनचे अध्यक्ष सौ. शर्मिला पवार यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी २१ किलोमीटर  एक हजार ऐकशे नव्यानव्ह,  दहा किलोमीटर ९९९, तीन किलोमीटर ३९९ फन रन , तीन  किलोमीटर १९९,( स्टुडन्ट रन ) असे शुल्क ठेवण्यात आले आहे, २१ किलोमीटर खुल्या गटासाठी  विजयेत्यास एकतीस हजार प्रथम उपविजेता एकवीस हजार,तर द्वितीय उपविजेत्यास  अकरा हजार असे पारितोषिक असणार आहे, ३० ते ६० प्लस वयोगटातील  प्रत्येकी विजयेत्यास दहा हजार, प्रथम उपविजेता सात हजार, तर द्वितीय उपविजेत्यास पाच हजार असे पारितोषिक देण्यात येणार आहे.

दहा किलोमीटर खुला गटासाठी  विजयेत्यास पंधरा हजार, प्रथम उपविजेता दहा हजार, द्वितीय उपविजेत्यास सात हजार असे पारितोषिक दिले जाणार आहे.३० ते ६० वयोगटातील  प्रत्येकी विजेत्यास पाच हजार प्रथम उपविजेता तीन हजार तर द्वितीय उपविजेतास दोन हजार रुपये दिले जाणार आहेत, दरवर्षीप्रमाणे बारामती रनर ग्रुपचे  मोलाचे सहकार्य लाभणार आहे, रनर ग्रुपचे अमोल  वाबळे यांनी या स्पर्धेची सविस्तर माहिती दिली, यावेळी इंद्रभान लव्हे, नितीन कारंडे, अजय साळवे, प्रेमेन्द्र देवकाते, पी. ए.देवकाते, डॉ. वरद देवकाते, दीपक घाडगे, अनिल दळवी, रोहित काटे, समीर ढोले, रवींद्र करळे, गुरुप्रसाद आगवणे, इत्यादी उपस्थित होते.