प्रत्यक्ष व्यवसाय करणारे अवघे ११ हजार ४२२

पुणे : शहरातील नोंदणीकृत २२ हजार ८८९ पथारी व्यावसायिकांची नोंद महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे आहे. मात्र त्यापैकी ११ हजार ४२२ पथारी व्यावसायिकच प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय करत असल्याचे फेरीवाला समिती निवडणुकीतील अंतिम मतदार यादीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निम्मे पथारी व्यावसायिक बेकायदा असल्याने त्यांना मतदान करता येणार नसून मतदार यादीमध्ये नसलेल्यांचे बायोमॅट्रिक परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

illegal chawl demolition drive in in titwala balyani Tekdi area
टिटवाळा बल्याणी टेकडी परिसरातील १३० बेकायदा चाळी जमीनदोस्त, चार दिवस सलग कारवाई
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
पिंपरी: कुदळवाडीतील पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकानांवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई; ६०७ बांधकामे भुईसपाट
फेरीवाल्यांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य का नाही? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, महानगरपालिकेला विचारणा
Municipal Corporation clarifies regarding unauthorized commercial establishments says Construction remains illegal after tax collection
कर आकारणीनंतरही बांधकाम अवैधच; अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण
Central Civil Services information in marathi
मुलाखतीच्या मुलखात : केंद्रीय सेवा
डोंबिवलीतील बेकायदा इमारती नियमानुकुलनाचे ३८ प्रस्ताव फेटाळले, झिरो मार्जीनमध्ये उभारलेल्या ५८ इमारती बेकायदाच
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक

हेही वाचा >>> पुणे : ‘बीआरटी मार्ग बंद करा’, पोलिसांचे महापालिकेला पत्र; बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी

गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली फेरीवाला समिती निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. फेरीवाला समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आठ सदस्य निवडीसाठी चार डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सन २०१४ पासून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी महापालिकेत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात बायोमॅट्रीक्स सर्वेक्षण करून अ, ब, क, ड, इ अशी पथारी व्यावसायिकांची वर्गवारी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पथारी व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी फेरीवाला समितीची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारने त्याबाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर महापालिकेने वीस सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्यात पथारी संघटनांच्या प्रतिनिधींचे अर्ज मागवून आठ सदस्यांची नियुक्ती केली होती. तर चार सदस्य सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी होते. उर्वरित महापालिका, पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. या समितीची मुदत संपल्याने नगरविकास विभागाने निवडणुकीचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> पुणे : प्रदीप शर्मांचा मुक्काम तीन महिने ससून रुग्णालयात

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २२ हजार ८८९ मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली होती. त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. पथारी व्यावसायिकांची समिती स्थापन करण्यासाठी ८ सदस्यांची निवड मतदानाद्वारे करण्यात येणार आहे. महापालिकेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मतपत्रिकेचा वापर करून ४ डिसेंबरला क्षेत्रिय कार्यालयनिहाय उभारण्यात येणाऱ्या केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदारयादी अंतिम करताना प्रशासनाने पुन्हा सर्व व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले. त्यासंदर्भात जाहीर प्रकटनही देण्यात आले होते. महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार १०५ व्यावसायिकांनी महापालिकेशी संपर्क साधून पुरावे दिल्यानंतर त्यांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भोसकून खून

अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली असून सुमारे ११ हजार ४२२ व्यावसायिक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करू शकणार आहेत. तर बायोमेट्रीक नोंदणी असतानाही व्यवसाय करत नसल्याचे १० हजार ६७४, एकापेक्षा अधिक परवाने घेतलेले (दुबार) २६४ आणि प्रमाणपत्र रद्द केलेल्या १३८ व्यावसायिकांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. बायोमेट्रीक नोंद असतानाही जागेवर व्यवसाय करत नसलेल्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

निवडणुकीचा कार्यक्रम

२ नोव्हेंबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

२ आणि ३ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्राचे वाटप करणे

९ आणि १० नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्र स्वीकारणे

११ नोव्हेंबर- नामनिर्देशन पत्रांची छाननी

१४ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्रांवरील आक्षेप, हरकती स्वीकारणे

२१ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्र मागे घेणे

२२ नोव्हेंबर – अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे

४ डिसेंबर – मतदान

५ डिसेंबर – मतमोजणी (गणेश कला क्रिडा मंच)

Story img Loader