पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या खटल्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली, ही समाधानाची बाब आहे. मात्र, या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार यांचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आले आहे. अद्याप मी निकालपत्र वाचलेले नाही. पुण्यातील विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

हेही वाचा : विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेधा पानसरे यांची मागणी

डॉ.नरेंद्र दाभोलकर , डॉ .एम. एमा. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांचे खून करण्यात आले. विवेकवाद्यांचे खून हा व्यापक कटाचा भाग आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना झालेली शिक्षा योग्य आहे. तपास यंत्रणेने मुख्य सूत्रधार शोध घेणे गरजेचे आहे, अशी मागणी गोविंद पानसरे यांच्या कन्या मेधा पानसरे यांनी केली आहे.

Story img Loader