दरवर्षी एक विषय घेत त्यावर वर्षभर अभ्यास आणि चित्रकाम करण्याचे काम सगर करतात. या उपक्रमात यंदा त्यांनी कर्नाटकातील हंपी हे ऐतिहासिक नगर निवडले होते. वर्षभरात केलेल्या या चित्रकामावर आधारित ‘विजयनगरचे वैभव- हंपी’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात हेमकुट पर्वतावरील मंडप, मंदिर समूह, प्रसिद्ध शिलारथ, दगडी राजतुला, हंपी बाजार, कृष्णमंदिर, तुंगभद्रा नदी, त्रषमुख पर्वत टेहळणी मनोरा, उग्र नृसिंह शिल्प, पुरंदरदास मंडप, आनेगुंदीचा किल्ला आदी हंपीचे वैभव दाखवणाऱ्या स्थळ-काळावरच्या कलाकृती आहेत. या चित्रवैभवाची दखल विजयनगर घराण्याचे सध्याचे वारस कृष्णदेवराय यांनी घेऊन सगर यांच्या कार्यास सहकार्य आणि पाठिंबा दिला.
गोळीबार मैदान चौकाजवळील कॅस्टेलिनो रस्त्यावरील अयातना आर्ट गॅलरीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्या (दि. २७) सायंकाळी सव्वाचार वाजता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन ५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वेळेत विनामूल्य खुले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2013 रोजी प्रकाशित
हंपीचे कलावैभव आजपासून भेटीला
चौदाव्या शतकातील हंपी राजवटीचे, तिच्या स्थापत्य वैभवाचे पुणेकरांना आजपासून दर्शन घडणार आहे. निमित्त आहे, प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांच्या ‘हंपी’ या चित्र प्रदर्शनाचे!
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 27-12-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hampi paint exhibition