दरवर्षी एक विषय घेत त्यावर वर्षभर अभ्यास आणि चित्रकाम करण्याचे काम सगर करतात. या उपक्रमात यंदा त्यांनी कर्नाटकातील हंपी हे ऐतिहासिक नगर निवडले होते. वर्षभरात केलेल्या या चित्रकामावर आधारित ‘विजयनगरचे वैभव- हंपी’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात हेमकुट पर्वतावरील मंडप, मंदिर समूह, प्रसिद्ध शिलारथ, दगडी राजतुला, हंपी बाजार, कृष्णमंदिर, तुंगभद्रा नदी, त्रषमुख पर्वत टेहळणी मनोरा, उग्र नृसिंह शिल्प, पुरंदरदास मंडप, आनेगुंदीचा किल्ला आदी हंपीचे वैभव दाखवणाऱ्या स्थळ-काळावरच्या कलाकृती आहेत. या चित्रवैभवाची दखल विजयनगर घराण्याचे सध्याचे वारस कृष्णदेवराय यांनी घेऊन सगर यांच्या कार्यास सहकार्य आणि पाठिंबा दिला.
गोळीबार मैदान चौकाजवळील कॅस्टेलिनो रस्त्यावरील अयातना आर्ट गॅलरीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्या (दि. २७) सायंकाळी सव्वाचार वाजता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन ५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वेळेत विनामूल्य खुले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा