पिंपरी : मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठ्याच्या तक्रारी पूर्णपणे घटल्या आहेत. सखल भागातील पाण्याचा अनावश्यक वापर कमी झाला. परिणामी, यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचे प्रमाण घटले. दरम्यान, पावसाने ओढ दिली असून पवना धरणात जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा म्हणजेच २० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ५० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून २० असे ५८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींमुळे सर्व भागाला समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून पाण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उंचावरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. कमी दाबाने, पुरेशा पाणी येण्याच्या तक्रारी पूर्णपणे घटल्या आहेत.

dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Water supply disrupted in Pune city due to interrupted power supply Pune
खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणपुढे महापालिका हतबल
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
pimpri chinchwad get water supply on alternate day despite pavana dam overflow
पिंपरी : पवना धरण काठोकाठ भरुनही पाणीपुरवठा दिवसाआडच; काय आहे नेमके कारण?
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pavana dam is 100 percent full
पिंपरी : शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली, पवना धरण भरले शंभर टक्के
Vashi Sector 26, Air pollution, Vashi pollution,
नवी मुंबई : वाशी सेक्टर २६ येथे धुरकट वातावरण, रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषण पुन्हा सुरू

हेही वाचा – हापूस तुटवडय़ाने कॅनिंग उद्योग अडचणीत

चढावरील भागातील पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर ते पाणी उताराकडील भागात जात होते. त्यामुळे उतारावरील लोकांचा पाण्याचा अनावश्यक वापर वाढत होता. आता अनावश्यक पाणी वापर बंद झाला आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्येदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरातील लोकसंख्येत ज्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता वाढत नाही. पाण्याची उपलब्धता वाढत नसल्याने एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा साठा

शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा २०.४० टक्क्यांवर आला आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षी आजच्या तारखेला २२.०६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले.

हेही वाचा – ‘भारत गौरव यात्रे’त महाराष्ट्र अभावानेच; रेल्वेचे उत्तर, दक्षिण भारतालाच प्राधान्य, राज्यातील मोजक्या स्थळांचा समावेश

दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे शहरातील सर्वच भागात समान पाणीपुरवठा झाला. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. महापालिका दिवसाला ५८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवठा करत आहे. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची उपलब्धता पाहता दिवसाआडच पाणीपुरवठा कायम ठेवला जाणार आहे. – श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

धरणात २०.२४ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. – समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण