लहान मुलांसाठी दिवाळीचा आनंद म्हणजे फटाके आणि नवे कपडे. या दोन गोष्टी मिळाल्या की मुलांना दिवाळी साजरी केल्याचा खराखुरा आनंद मिळतो; पण ज्यांना नवे कपडे मिळत नसतील अशा मुलांचे काय, हा प्रश्न ‘प्रिय मराठी’ संस्थेच्या सत्येंद्र राठी यांना पाच वर्षांपूर्वी पडला आणि त्यातून त्यांनी स्वखर्चातून सुरू केला ‘वस्त्र दिवाळी’ हा उपक्रम. यंदा या उपक्रमात एक लाख रुपयांचे कपडे ते मुलांना देणार आहेत.
‘वस्त्र दिवाळी’ उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे दरवर्षी हा उपक्रम वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये केला जातो आणि त्या त्या भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मुलांची निवड करण्याचे काम दिले जाते. जी मुले-मुली खरोखरच गरजू आहेत, अशांना नवे कपडे मिळावेत या दृष्टीने सेविकांवर ही जबाबदारी टाकली जाते आणि दरवर्षी किमान तीनशे मुला-मुलींना नवे कपडे दिवाळीच्या आधी वाटले जातात.
या उपक्रमाचे वेगळेपण म्हणजे, कपडे वाटण्यापूर्वी मुलांची यादी तयार झालेली असते आणि प्रत्येक मुलाला त्याच्या मापाप्रमाणेच कपडे दिले जातात. कपडे वाटपाचा कोणताही गाजावाजा वा समारंभ केला जात नाही. कोणा सेलिब्रेटिला बोलावून समारंभ करायचा. मग त्यात हार-तुरे, भाषणे, सत्कार. या सगळ्या प्रकारात मुलांना काहीच रस नसतो. त्यामुळे निवडलेल्या वस्तीतील एखाद्या मंदिरात सर्व मुलांना बोलावले जाते आणि कोणतीही औपचारिकता न ठेवता त्यांना कपडय़ांचे वाटप केले जाते, अशी माहिती राठी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या कार्यक्रमातून मी कोणीतरी देणारा आहे आणि समोरचा गरजू आहे, घेणारा आहे, असा भाव येऊ नये यासाठीच समारंभ करत नाही, असे सांगून राठी म्हणतात की, आज जी मुले घेणारी आहेत, तीच उद्या मोठी होतील, ती देणारी होतील, हा विश्वास मला आहे आणि तोच संस्कार या उपक्रमातून त्यांच्यावर होतो.
लाख, लाख मोलाची वस्त्र दिवाळी..
जी मुले-मुली खरोखरच गरजू आहेत, अशांना नवे कपडे मिळावेत या दृष्टीने सेविकांवर ही जबाबदारी टाकली जाते आणि दरवर्षी किमान तीनशे मुला-मुलींना नवे कपडे दिवाळीच्या आधी वाटले जातात.
आणखी वाचा
First published on: 23-10-2013 at 02:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy diwali for childrens of priya marathi sanstha by satyendra rathi