शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी टिप्पणी केली. सुनील शेळके हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बघता कोण कुठे जाईल आणि कोण कोणासोबत युती करेल याचा भरोसा नाही, असे शेळके म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. परंतु, काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती त्यांना एकत्र येऊ देत नाहीत, असे म्हणत शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

हेही वाचा – पिंपरी : धक्कादायक! श्वान मादीवर लैंगिक अत्याचार

हेही वाचा – RTE Admissions: प्रवेशासाठी निवड यादी जाहीर…किती विद्यार्थ्यांना प्रवेश?

सुनील शेळके म्हणाले, शरद पवार हे मतदारसंघात आले म्हणून अतुल बेनके यांनी स्वागत केलं. शरद पवार आणि अतुल बेनके यांच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती स्वतः अतुल बेनके यांनी मला दिली. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर कोण कुठल्या पक्षात जाईल, कोण कोणाशी युती करेल याचा सध्या भरोसा नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy if sharad pawar and ajit pawar come together but why exactly did sunil shelke say that kjp 91 ssb
Show comments