लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी: घरगुती कारणावरून विवाहितेला त्रास देत गळा दाबून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला घरात १५० उठाबशा काढायला लावल्या. हा प्रकार मंगळवारी (दि.९) दुपारी दीडच्या सुमारास किवळेतील आदर्शनगर येथे घडला.

पिडीत विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, मोसिन मुबारक मुल्ला, दोन महिला (सर्व रा. आदर्शनगर, किवळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा… गदिमा नाट्यगृह, तारांगण प्रकल्प खुला करा; पीसीसीएफची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये फिर्यादी यांचा विवाह झाला. त्यानंतर सासरच्या लोकांनी घरातील किरकोळ कारणावरून फिर्यादीसोबत वाद घातला. फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीस घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या. या प्रकरणी देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harassed the married woman and made her do 150 sit ups in dehuroad pimpri pune print news ggy 03 dvr