महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची काठिण्य पातळी वाढली असून गुणवत्तेचा कस या परीक्षेमध्ये लागेल, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी आणि उमेदवारांनीही व्यक्त केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणेच ही परीक्षा असल्यामुळे या परीक्षेतही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अधिक फायदा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयोगाच्या बदलणाऱ्या परीक्षा पद्धतीचे तज्ज्ञ आणि उमेदवारांकडून स्वागत करण्यात आले. याबाबत ‘पृथ्वी अॅकॅडमी’चे संचालक विश्वनाथ पाटील यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदललेली परीक्षा पद्धत स्वागतार्ह आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी वाढल्याचे दिसत आहे. ज्या उमेदवारांना विषय नीट समजला असेल, ज्यांना स्वत:चा विचार करून उत्तरे लिहिण्याची सवय असेल, त्या उमेदवारांसाठी ही परीक्षा सोपी ठरली असेल. त्याचप्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच असल्याने दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल.’’ ‘द युनिक अॅकॅडमी’चे संचालक तुकाराम जाधव यांनी सांगितले, ‘‘या वेळची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची काठिण्य पातळी वाढवून दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने उत्तम पाऊल उचलले आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा