अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या हर्षां लुणावत आणि अनुजा शिंगाडे या युवतींना नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यात अधिक रस होता. ठराविक पठडीतील व्यवसाय करण्यापेक्षा त्यांनी वेगळा व्यवसाय सुरू केला. गुलाबाच्या फुलांवर नाव, छायाचित्रे, कंपन्यांची बोधचिन्हे मुद्रित करून ती फुले भेटवस्तू म्हणून तयार करून देण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला. वेगळी संकल्पना असलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी दोघींनीही संशोधन केले आणि ‘सिराह’ नावाच्या कंपनीची स्थापना केली. फुलांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता आणि त्यांचे आयुष्य कमी होणार नाही याबाबत दक्षता घेऊन त्यांनी छपाईचे तंत्रज्ञान विकसित केले. अल्पावधीतच पुण्याबरोबर मुंबईमध्येही कंपनीची शाखा सुरू करण्यात आली. कंपनीच्या उत्पादनांना विविध राज्यांमधून मागणी असल्याने देशभरात कंपनीच्या शाखा सुरू करण्याचा दोघींचा मानस आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हर्षां लुणावत आणि अनुजा शिंगाडे यांनी सिराह (कन्व्हर्टिग आयडियाज इन रियालिटी अनुजा अॅण्ड हर्षां) ही पार्टनरशीप फर्म २०१६ मध्ये स्थापन केली. आहे. हर्षां आणि अनुजा या दोघींनीही पुण्यातून अभियांत्रिकीची (इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेशन – इएनटीसी) पदवी घेतली आहे. शिक्षण घेत असल्यापासून दोघीही एकत्र राहत असल्याने कामही एकत्र करण्याचे ठरवले. पदवी घेतल्यानंतर हर्षां, अनुजा यांनी एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर लोकांना भेटवस्तू देण्यासाठी उत्तम पर्याय द्यावा, असा विचार पुढे आला आणि त्यावर त्यांनी अभ्यास सुरू केला. पुष्पगुच्छ, फुले दिल्यानंतर ती खराब होण्याची भीती असते. परंतु, यामध्ये काही वेगळे करता येईल का? या विचारातून त्यांनी अभ्यास पुढे नेला. सजीव गोष्टींवर आपले किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचे नाव असणे, ही भावणारी गोष्ट आहे. हल्ली आपल्या स्वत:च्या किंवा प्रिय व्यक्तीच्या नावाचे टॅटू हातावर, मानेवर काढण्याची क्रेझ आहे. त्यातूनच फुलांवर नाव, छायाचित्र टाकल्यास अनेकांची पसंती मिळेल, याची खात्री झाल्याने याबाबत हर्षां आणि अनुजा यांनी गुलाब पुष्पांवर नाव, छायाचित्र, बोधचिन्ह मुद्रित करून देण्याच्या व्यवसायाचा विचार केला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी पार्टनरशीप फर्मची स्थापना केली आणि आता दोघीही पूर्णवेळ हाच व्यवसाय करत आहेत.
या दोन मैत्रिणींना एकत्र येऊन काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे एकमेकींचे परस्पर सहकार्य आणि विश्वास यामधून व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना फुलांवर नाव, छायाचित्रे काढून भेट म्हणून देणे, ही संकल्पनाच फारशी माहिती नव्हती. त्यामुळे हर्षां, अनुजा यांनी आपल्या उत्पादनाची समाजमाध्यमे, पत्रके या माध्यमातून जाहिरात करायला सुरुवात केली. सिराहचे फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. जाहिरात पाहिल्यानंतर हा पूर्णपणे नवीन प्रकार पाहून कुतूहलापोटी मागणी येऊ लागली. अभियांत्रिकीनंतर केलेल्या नोकरीमुळे राजकीय, कॉर्पोरेट, उद्योग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा परिचय झाला होता. त्यामुळे सचिन तेंडूलकर, स्टीव स्मिथ, अंकित शर्मा, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, मुग्धा गोडसे, करिश्मा कपूर, अमित त्रिवेदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना हर्षां, अनुजा यांनी स्वखर्चाने फुले, पुष्पगुच्छ पाठविले होते. या सर्व मान्यवरांनीही दोघींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ या दिवशी या फुलांना मोठी मागणी असते. वर्षभरात मिळून जेवढी मागणी होते, त्यापेक्षा अधिक मागणी केवळ या दिवशी कंपनीकडे असते.
फुलांवर नाव किंवा छायाचित्र छापण्याची माहिती या दोघींनी घेतली होती. परंतु, प्रत्यक्षात काम कसे करायचे, याबाबत मुंबईमधील दादर परिसरात राहणारे आणि या क्षेत्राचा बऱ्याच वर्षांचा अनुभव असणारे बंकीम सर यांनी हर्षां, अनुजा यांना खूप मदत केली. दरम्यान, बीव्हीजी कंपनीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात निमंत्रित केलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी सिराहचे पुष्पगुच्छ घेण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आले होते. त्यांनीही पुष्पगुच्छ पाहिल्यानंतर वेगळ्या संकल्पनेबद्दल हर्षां, अनुजा यांचे कौतुक केले. अशाप्रकारे कंपनीचा प्रचार, प्रसार होत गेला. अनुजा यांचे लग्न झाल्यानंतर त्या मुंबईला स्थायिक झाल्या असून त्यांनी तेथे कंपनीची दुसरी शाखा सुरू केली आहे. गुलाबाची फुले अतिशय नाजुक असतात. फुलांवर नाव, छायाचित्र, बोधचिन्ह किंवा मागणीनुसार काहीही प्रिंट करण्यासाठी खास यंत्र तयार करण्यात आले आहे. परंतु, काही काम हातानेच करावे लागते. हाताने काम करताना ते संयमाने करावे लागते. फुलांच्या एका पुष्पगुच्छावर नाव, छायाचित्र मुद्रित करण्यासाठी किमान तीन तास लागतात. हर्षां, अनुजा स्वत: हे काम करतात. मागणी वाढल्यामुळे सहकार्यासाठी मुंबईमध्ये दोन आणि पुण्यात एक असे तीन कर्मचारी नियुक्त आहेत. सुरुवातीला सिराहकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांची किंमत एक हजार रुपयांपासून पुढे होती. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या प्रियजनांना गुलाब पुष्पावर नाव, छायाचित्रे छापून भेट म्हणून देता यावीत, यासाठी पुष्पगुच्छापेक्षा एका फुलाची विक्री कंपनीने सुरू केली असून त्याची किंमत शंभर रुपयांपासून पुढे आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्या, राजकीय मान्यवरांकडून चार ते पाच फूट उंचीपर्यंतच्या फुलांच्या गुच्छांची मागणी कंपनीला येते.
‘बॉक्समध्ये पॅकिंग करून फुले पाठविली जातात. पुणे, मुंबईबरोबरच सुरत, हैद्राबाद या शहरांसह मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली अशा विविध राज्यांमधूनही सिराहच्या उत्पादनांना मागणी आहे. परदेशातूनही मागणी आहे, परंतु परदेशात कमी संख्येने फुले किंवा फुलांचे पुष्पगुच्छ पाठवणे हे किचकट काम आहे. त्यामुळे याबाबत विविध पर्यायांवर आम्ही दोघीही काम करत आहोत. या दोन शाखांमधूनच देशभरात उत्पादने पाठविण्यात येतात. त्यामुळे दिल्ली, राजस्थान, गुजरात अशा विविध राज्यांसह देशभरात शाखा सुरू करण्याचा मानस आहे’, असेही हर्षां सांगतात.
prathamesh.godbole@expressindia.com