इंदापूर: छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजी राजांचे ध्येय व कार्य डोळ्यासमोर ठेवा.  कार्यकर्त्यांनो नाउमेद होऊ नका .छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे एकत्र करून महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

हा इतिहास व आदर्श डोळ्यासमोर ठेवा .आणि कामाला लागा. असे आवाहन करीत ‘जय शिवराय ‘ हि आपली स्लोगन राहिल ,अशी शिवगर्जना राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगली येथे नुकत्याच राष्ट्रवादीच्या  मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर केली.

विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रथमच सांगली येथे मेळावा आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान हर्षवर्धन पाटील नवा उत्साह घेऊन नव्या दमाने पक्ष संघटनेच्या कामाला पुन्हा लागल्याने इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना उभारी आल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकी मधील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीची परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये का राहिली नाही .याची कारणे मिमांसा झाली पाहिजे .कार्यकर्त्यांनी आपल्या कामांमध्ये झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. नवा विचार घेऊन आता आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे .आपल्याकडे आता सत्ता नसल्यामुळे आपण जरी कोणाला काही देऊ शकलो नाही.

तरी सुद्धा लोकांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी आता मोर्चे, आंदोलने काढून रस्त्यावर यावे लागेल. याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. असे स्पष्ट करून ते म्हणाले ,पक्षाने आपल्याला काय दिले .हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण पक्षासाठी काय केले .हा मुद्दा आज घडीला महत्त्वाचा असून कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर आत्मपरीक्षण व अभ्यास केला पाहिजे.

आपण सत्तेत नाही आपला पराभव झाला याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या पाठीमागे माणसं नाही लाखो मतदान आपल्या उमेदवारांना पडलेले आहे. लोकसभेमध्ये आपले भरपूर खासदार आहे. विधानसभेमध्ये आपले आमदार आहेत .यांच्या माध्यमातून आपण लोकांसमोर जाऊ .लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ. लोकांच्या न्याय हक्कासाठी मूलभूत प्रश्नांसाठी आता नव्या दमाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

काम करताना ‘जय शिवराय’ हे घोषवाक्य घेऊन छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन, छत्रपती संभाजी राजांचे कर्तुत्व डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर राहिली. त्यानंतर ते आत्मपरीक्षण करत तळागाळात गेले. आपण मात्र, हिशोब करीत बसलो .भ्रमात राहिलो कोण मंत्री होणार ? आपले किती आमदार येणार . अशी कबुली देत या गोष्टीचं सुद्धा आत्मपरीक्षण झाले पाहिजे. कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा फोकस पॉइंट निश्चित करून पुढची रूपरेषा आखली पाहिजे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची आजची अवस्था काय आहे ?असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले सत्ता येते.सत्ता  जाते. आपला सातबाराचा उतारा तर कोण बदलणार नाही?

असा सवाल उपस्थित करून आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा चांगल्या प्रकारची भूमिका आपला  पक्ष, आपली महाविकास आघाडी यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही.असा आत्मविश्वास व्यक्त करुन आगामी काळामध्ये पक्षाच्या मेळाव्याचे स्वरूप बदलण्याचेही त्यांनी सुतोवाच केले. कार्यकर्त्यांनो चल बिचल होऊ नका सकारात्मक रहा .आगामी काळामध्ये सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी आपण पुन्हा सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही.असा दिलासाही यावेळी त्यांनी दिला.

Story img Loader