लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि नुकताच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा अद्यापही असून त्यांनी तो सोडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे पुरंदरचे आमदार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाटील यांची उमेदवारी नाकारावी, अशी आग्रही मागणी जगताप यांनी केली आहे. त्यामुळे इंदापूर काँग्रेस भवनाच्या वास्तूच्या ताब्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमदार करून वेळोवेली मंत्रीपदे दिली. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडताना इंदापूर काँग्रेस भवनाच्या इमारतीची आतील भागात मोडतोड केली होती. इमारतीचे नुकसान करून कब्जा सोडलेला नव्हता. इंदापूर काँग्रेस भवनाची इमारत आणि जागा इंदापूर काँग्रेस समितीच्या ताब्यात नाही. मात्र मालकी हक्कासंबंधिच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून कागदपत्रावर इंदापूर तालुका काँग्रेस चॅरीटेबल ट्रस्ट असे दर्शविण्यात आले आहे. या संदर्भात सिटी सर्व्हे, मिळकतपत्र आणि जागेचा नकाशा ही खोटी कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत, असा आक्षेप जगताप यांनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा-पुणे : प्रभात रस्त्यावर इमारतीत आग; ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुटका
सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये इंदापूरची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला देण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. पाटील यांनी काँग्रेस भवनाची इमारत आणि जागा ताब्यात ठेवली आहे. ती जोपर्यंत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यता येऊ नये. पाटील यांनी काँग्रेस भवनाचा ताबा ठेवल्याची माहिती मदारसंघात प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. इंदापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तशी भूमिका आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.